Ad will apear here
Next
श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू
श्रीकृष्णाच्या चातुर्यापासून ते त्याच्या महान तत्त्वज्ञानापर्यंत अनेक गुणांची आपल्याला ओळख आहे; मात्र तो एक कुशल व्यवस्थापक होता, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मुलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशलव्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व.’ हे पटवून देण्यासाठी प्रा. जाधव यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.

‘यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते.’ या मुद्द्यांपासून ते सुरुवात करतात. यातंतर महाभारताच्या लढाईत श्रीकृष्णाचे मॅनेजमेंट कौशल्य कसे होते, याची माहिती ते देतात. शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते, श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र, त्याची डिनर डिप्लोमसी यावर विचार करून त्याचे मोरपीस, बासरी याचा उपयोग कसा झाला, ते सांगतात. कृष्णाने क्रायसिस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंटचा कसा वापर केला, हेही समजते.

प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : १९१
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZFBP
Similar Posts
शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र कोणत्याही संस्थेची उभारणी करायची असेल, तर अर्थव्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांनी, तर स्वराज्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थापन कसे केले असेल, हा कुतूहलाचा विषय आहे. प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात महाराजांच्या अर्थशास्त्रावर प्रकाश टाकला आहे.
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे
जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् मुलांचे संगोपन ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे; मात्र आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला हवा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून दिलेले संस्कार त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी उपयुक्त ठरले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language